या पोस्टमध्ये आम्ही Navnath Bhaktisar 40 Adhyay देत आहोत आणि तुम्ही येथून Shree Swami Samarth nitya seva pdf डाउनलोड करू शकता.
Navnath Bhaktisar 40 Adhyay Download
ऐशा रीती पाकशासन ॥ बैसला सेवूनि सभास्थान ॥
मग बृहस्पती विस्मयरत्न ॥ चरपटप्रताप सांगतसें ॥१०॥
अहा वय धाकुटें सान स्वरुप ॥ परी अर्कासमान थोर प्रताप ॥
हरिहरादि करुनि लोप ॥ स्थापूनि गेला आपुलेचि ॥११॥
तरी वाताकर्षणविद्या सबळ ॥ देवदानव झाले निर्बळ ॥
नाथपंथीं हें महाबळ ॥ आतळलें कैसें कळेना ॥१२॥
तरी यातें करुनि उपाय ॥ साध्य करावी इतुकी ठेव ॥
या कर्मासी कोण लाघव ॥ स्वीकारावें महाराजा ॥१३॥
कीं तयाच्या गृहाप्रती जावून ॥ दास्य करावें मनोधर्मे ॥
तोषवूनि सर्व कर्म ॥ महीवरी मिरवावें ॥१४॥
असो यापरी यत्न करुन ॥ भेट घ्यावी त्या गंवसून ॥
परी ते जोगी तीव्रपणें ॥ वर्तताती सर्वदा ॥१५॥
तरी उगलीच घेऊनि सदृढ भेट ॥ अर्थ वदावा तयासी निकट ॥
परी काय चाड आमुची अलोट ॥ कार्यार्थी भीड कोणती ॥१६॥
तरी भिडेचें उपजेपण ॥ उजेड पडेल दासत्वेंकरुन ॥
तयामागें रानोरान ॥ अपार मही हिंडावी ॥१७॥
तरी हिंडल्यानें कोणे काळीं ॥ उदय पावेल कृपानव्हाळी ॥
अमरपुरीची देवमंडळी ॥ तेजोयुक्त होईल ॥१८॥
म्हणाल ऐसें कासयान ॥ हा विपर्यास येईल घडोन ॥
तरी महीं होतो पुण्यपावन ॥ आसन माझें घेतसे ॥१९॥
तरी मी येथें सावधान ॥ करुनि रक्षितों आपुलें आसन ॥
तस्मात् अमरावती सोडून ॥ जाणें नाहीं मजलागीं ॥२०॥
ऐसें बोलतां अमरपती ॥ बोलता झाला वाचस्पती ॥
म्हणे महाराजा नाथाप्रती ॥ येथेंचि आणावे महायत्नें ॥२१॥
तरी तो यत्न म्हणशील कैसा ॥ यज्ञ करावा सोमभासा ॥
त्या निमित्तें नाथ राजसा ॥ घेवोनि यावें स्वर्गासी ॥२२॥
मग तो येथें आल्यापाठी ॥ दावूनि भक्तीची अपार कोटी ॥
मोह उपजवोनि नाथापोटीं ॥ कार्य साधूनि घेइजे ॥२३॥
ऐसें बोलतां तपोद्विज ॥ परम तोषला अमरराज ॥
उपरी म्हणे महाराज ॥ कोणा पाठवूं पाचाराया ॥२४॥
यावरी बोले कचतात ॥ हे महाराज अमरनाथ ॥
मच्छिंद्रपिता अष्टवसूंत ॥ उपरिचर नामें मिरवतसे ॥२५॥
पूरा पढ़ने के नीचे दिए गए डाउनलोड बटन पर क्लिक करे।
टीप- या पोस्टमध्ये दिलेल्या कोणत्याही पीडीएफ बुक, पीडीएफ फाइलचा या वेबसाइटच्या मालकाशी कोणताही संबंध नाही. या पोस्टमध्ये दिलेल्या कोणत्याही पीडीएफ बुक, पीडीएफ फाइलबाबत कोणाला काही अडचण असल्यास [email protected] या मेल आयडीवर संपर्क साधा. आम्ही ते पोस्ट त्वरित साइटवरून काढून टाकू.
मित्रांनो, जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना या वेबसाइटबद्दल नक्की सांगा.