या पोस्टमध्ये आम्ही Shani Mahatmya देत आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून Shani Mahatmya Download करू शकता आणि इथून Shree Lakshmi Sukta Pdf देखील करू शकता.
श्रीगणेशाय नमः ॥
ॐ नमोजी गणनायका ॥
एकदंता वरदायका ॥
स्वरुपसुंदरा विनायका ॥
करी कृपा मजवरी ॥1॥
आता नमूं ब्रह्मकुमारी ॥
हंसारुढ वागीश्वरी ॥
वीणा शोभे दक्षिण करीं ॥
विजयमूर्ति सर्वदा ॥2॥
नमन माझें गुरुवार्या ॥
सुखमूर्ति करुणालया ॥
नमूं संतश्रोतयांच्या पायां ॥
अभेद भेदा करुनी ॥3॥
आता नमूं श्रीपांडुरंगा ॥
यावें तुवां कथेचिया प्रसंगा ॥
निरसूनि माझिया भवसंगा ॥
करी कृपा मजवरी ॥4॥
गुजराथ भाषेची कथा ॥
नवग्रहांची तत्त्वतां ॥
ही ऐकता एकचिता ॥
संकटा व्यथा न बाधती ॥5॥
आता उज्जनीनाम नगरीं ॥
राजा विक्रम राज्य करी ॥
तेथील चरित्राची परी ॥
ऐका चित्त देऊनियां ॥6॥
कोणी एके दिवशीं प्रातः काळी ॥
बैसली होती सभामंडळी ॥
तेथे महापंडित त्या काळीं ॥
लहान थोर बैसले ॥7॥
ऐसी सभा बैसली घनदाट ॥
तेथें चर्चा निघाली सुभट ॥
म्हणती नवग्रहांत कोण श्रेष्ठ ॥
सांगावे नीट निवडोनी ॥8॥
कोण्या ग्रहाची कैसी स्थिती ॥
कैसी पूजा कैसी मती ॥
कोण रूप कैसी गती ।
ऐसें यथार्थ सांगावे ॥9॥
ऐसें ऐकतांचि उत्तर ॥
पंडित सरसावले समोर ॥
काढोनि पुस्तकांचा संभार ॥
बोलती ते यथामतीनें ॥10॥
प्रथम एक पंडित बोलिला ॥
रविग्रह तो असे भला ।
जो लागे त्याच्या उपासनेला ॥
त्यासी ग्रहपीडा न बाधे ॥11॥
रवि तो सूर्यनारायण ॥
जे नर झाले तप्तरायण ॥
त्यांची विघ्नें होती निरसन ॥
महासामर्थ्य रवीचे ॥12॥
आधि व्याधि दरिद्र ॥
स्मरणमात्रेंचि होती दूर ॥
मग उपासना करी जो नर ॥
चिंतले अर्थ सर्व पुरती ॥13॥
रवि तो मुख्य दैवत ॥
त्यावीण सर्वही जाणा व्यर्थ ॥
नवग्रह आज्ञा पाळीत ॥
ऐसा श्रेष्ठ ग्रह हा ॥14॥
ऐकता रवीची वार्ता ॥
आणि इतर ग्रहांची कथा ॥
तेणे निवारे सर्व व्यथा ॥
ऐसे नवग्रहही समर्थ ॥15॥
परी रवि असे महाबळी ॥
सर्वांमाजी अर्तुबळी ॥
प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळीं ॥
तो हा सूर्यनारायण ॥16॥
तंव दुसरा पंडित बोलत ॥
सोमासी असे बळ अद्भुत ॥
तो माळी असे म्हणवीत ॥
वनस्पती पोषीतसे ॥17॥
जयांचे आराध्य दैवत ॥
शिव सांब कैलासनाथ ॥
त्याच्या भाळी हा विलसत ॥
म्हणोनि श्रेष्ठ जाणावा ॥18॥
चंद्र वर्षि अमृतास ॥
तृप्त करी सर्व देवांस ॥
निशिराज महारुपस ॥
षोडश कळा जयासी ॥19॥
तो न गांजी कोणासी ॥
अति सौख्यदाता सर्वांसी ॥
सदासर्वदा निर्मळ मानसी ॥
धन्य जयाचें पूजन ॥20॥
हे पुस्तक पूर्णपणे वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Shani Mahatmya Free Download
टीप- या पोस्टमध्ये दिलेल्या कोणत्याही पीडीएफ बुक, पीडीएफ फाइलचा या वेबसाइटच्या मालकाशी कोणताही संबंध नाही. या पोस्टमध्ये दिलेल्या कोणत्याही पीडीएफ बुक, पीडीएफ फाइलबाबत कोणाला काही अडचण असल्यास newsbyabhi247@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधा. आम्ही ते पोस्ट त्वरित साइटवरून काढून टाकू.
मित्रांनो, जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना या वेबसाइटबद्दल नक्की सांगा.