या पोस्टमध्ये आम्ही Shree Manache Shlok 1 to 205 देत आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून Download करू शकता आणि इथून Partner Marathi book pdf Free Download देखील करू शकता.
Shree Manache Shlok 1 to 205 Download
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥
मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडू नये तो ।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥
मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडू नको हो ।
मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची ।
विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ६ ॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।
मना बोलणे नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी ।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे ।
परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होता मनासारखे दुःख मोठे ॥ ९ ॥…
लेखक | समर्थ रामदास स्वामी |
एकूण पृष्ठे | 48 |
साइज़ | 1 MB |
हे मराठीतील अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे. तुम्हालाही पुस्तक आवडते आणि ते वाचायचे आहे, म्हणूनच तुम्ही या वेबसाइटवर आला आहात.
तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि पुस्तक डाउनलोड केल्यानंतर ते वाचा.
टीप- या पोस्टमध्ये दिलेल्या कोणत्याही पीडीएफ बुक, पीडीएफ फाइलचा या वेबसाइटच्या मालकाशी कोणताही संबंध नाही. या पोस्टमध्ये दिलेल्या कोणत्याही पीडीएफ बुक, पीडीएफ फाइलबाबत कोणाला काही अडचण असल्यास newsbyabhi247@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधा. आम्ही ते पोस्ट त्वरित साइटवरून काढून टाकू.
मित्रांनो, जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना या वेबसाइटबद्दल नक्की सांगा.