या पोस्टमध्ये आम्ही Vyankatesh Stotra Marathi देत आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून व्यंकटेश स्तोत्र मराठी मोफत डाउनलोड करू शकता आणि इथून Ganesh Chaturthi Vrat Katha Pdf देखील करू शकता.
Vyankatesh Stotra Marathi pdf
श्रीगणेशाय नमः । श्रीव्यंकटेशाय नमः ।
ॐ नमो जी हेरंबा ।सकळादि तूं प्रारंभा ।
आठवूनि तुझी स्वरुपशोभा । वंदन भावें करीतसे ॥ 1॥
नमन माझे हंसवाहिनी । वाग्वरदे विलासिनी ।
ग्रंथ वदावया निरुपणी । भावार्थखाणी जयामाजी ॥ 2॥
नमन माझे गुरुवर्या । प्रकाशरुपा तूं स्वामिया ।
स्फूर्ति द्यावी ग्रंथ वदावया । जेणें श्रोतया सुख वाटे ॥ 3॥
नमन माझे संतसज्जना । आणि योगियां मुनिजनां ।
सकळ श्रोतयां सज्जना । नमन माझे साष्टांगी ॥ 4 ॥
ग्रंथ ऐका प्रार्थनाशतक । महादोषासी दाहक ।
तोषूनियां वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील ॥ 5॥
जयजयाजी व्यंकटरमणा । दयासागरा परिपूर्णा ।
परंज्योति प्रकाशगहना । करितों प्रार्थना श्रवण कीजे ॥ 6 ॥
जननीपरी त्वा पाळिलें । पितयापरी त्वां सांभाळिले ।
सकळ संकटापासूनि रक्षिलें । पूर्ण दिधलें प्रेमसुख ॥ 7॥
हें अलोलिक जरी मानावें । तरी जग हें सृजिलें आघवें ।
जनकजनीपण स्वभावें । सहज आलें अंगासी ॥ 8 ॥
दीनानाथा प्रेमासाठी । भक्त रक्षिले संकटी ।
प्रेम दिधलें अपूर्व गोष्टी । भजनासाठी भक्तांच्या ॥ 9 ॥
आतां परिसावी विज्ञापना । कृपाळुवा लक्ष्मीरमणा ।
मज घालोनी गर्भाधाना । अलौकिक रचना दाखविली ॥ 10 ॥
तुज न जाणतां झालों कष्टी । आतां दृढ तुझे पायीं घातली मिठी ।
कृपाळुवा जगजेठी । अपराध पोटीं घालीं माझें ॥ 11 ॥
माझिया अपराधांच्या राशी । भेदोनि गेल्या गगनासी ।
दयावंता हृषीकेशी । आपुल्या ब्रीदासी सत्य करीं ॥ 12 ॥
पुत्राचे सहस्त्र अपराध । माता काय मानी तयाचा खेद ।
तेवीं तू कृपाळू गोविंद । मायबाप मजलागी ॥ 13 ॥
उदडांमाजी काळेगोरे । काय निवडावें निवडणारे ।
कुचलिया वृक्षांची फळें । मधुर कोठोनि असतील ॥ 14 ॥
अराटीलागीं मृदुला । कोठोनि असेल कृपावंता ।
पाषाणासी गुल्मलता । कैसियापरी फुटतील ॥ 15 ॥
आपादमस्तकावरी अन्यायी । परी तुझे पदरीं पडिलों पाहीं ।
आतां रक्षण नाना उपायीं । करणें तुज उचित ॥ 16 ॥
समर्थाचिये घरीचे श्र्वान । त्यासी सर्वही देती मान ।
तैसा तुज म्हणवितों दीन । हा अपमान कवणाचा ॥ 17 ॥
लक्ष्मी तुझे पायांतळी । आम्ही भिक्षेसी घालोनि झोळी ।
येणे तुझी ब्रीदावळी । कैसी राहील गोविंदा ॥ 18 ॥
कुबेर तुझा भांडारी । आम्हां फिरविसी दारोदारीं ।
यांत पुरुषार्थ मुरारी । काय तुजला पैं आला ॥ 19 ॥
द्रौपदीसी वस्त्रें अनंता । देत होतासी भाग्यवंता ।
आम्हांलागी कृपणता । कोठोनि आणिली गोविंदा ॥ 20 ॥
मावेची करुनी द्रौपदी सती । अन्ने पुरविलीं मध्यरातीं ।
ऋषीश्र्वरांच्या बैसल्या पंक्ती । तृप्त केल्या क्षणमात्रें ॥ 21 ॥
अन्नासाठी दाही दिशा । आम्हा फिरविसी जगदिशा ।
कृपाळुवा परमपुरुषा । करुणा कैसी तुज न ये ॥ 22 ॥
अंगीकासा री या शिरोमणी । तुज प्रार्थितो मधुर वचनीं ।
अंगीकार केलिया झणीं । मज हातीचे न सोडावें ॥ 23 ॥
समुद्रे अंगीकारिला वडवानळ । तेणें अंतरी होतसे विव्हळ ।
ऐसें असोनि सर्वकाळ । अंतरी सांठविला तयानें ॥ 24 ॥
कूर्में पृथ्वीचा घेतला भार । तेणे सोडिला नाहीं बडिवार ।
एवढा ब्रह्मांड गोळ थोर । त्याचा अंगीकार पै केला ॥ 25 ॥
शंकरे धरिलें हाळाहळा । तेणे नीळवर्ण झाला गळा ।
परी त्यागिले नाही गोपाळा । भक्तवत्सला गोविंदा ॥ 26 ॥
माझ्या अपराधांच्या परी । वर्णितां शिणली वैखरी ।
दुष्ट पतित दुराचारी । अधमाहूनि अधम ॥ 27 ॥
विषयासक्त मंदमति आळशी । कृपण कुव्यसनी मलिन मानसीं ।
सदा सर्वकाळ सज्जनांसी । द्रोह करी सर्वदा ॥ 28 ॥
वचनोक्ति नाहीं मधुर । अत्यंत जनासी निष्ठुर ।
सकळ पामरांमाजीं पामर । व्यर्थ बडिवार जगी वाजे ॥ 29 ॥
काम क्रोध मद मत्सर । हें शरीर त्यांचे बिढार ।
कामकल्पनेसी थोर । दृढ येथे केला असे ॥ 30 ॥
अठरा भार वनस्पतींची लेखणी । समुद्र भरला मषीकरुनी ।
माझे अवगुण लिहितां धरणीं । तरी लिहिले न जाती गोविंदा ॥ 31 ॥
ऐसा पतित मी खरा । तरी तूं पतितपावन शारङ्गधरा ।
तुवां अंगीकार केलिया गदाधरा । कोण गुणदोष गणील ॥ 32 ॥
नीचा रतली रायासीं । तिसी कोण म्हणेल दासी ।
लोह लागतां परिसासी । पूर्वस्थिती मग कैंची ॥ 33 ॥
गांवीचे होते लेंडवोहळ । गंगेसी मिळतां गंगाजळ ।
काकविष्ठेचे झाले पिंपळ । तयांसी निंद्य कोण म्हणे ॥ 34 ॥
हे पुस्तक PDF फाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा।
Vyankatesh Stotra Marathi pdf Download
टीप- या पोस्टमध्ये दिलेल्या कोणत्याही पीडीएफ बुक, पीडीएफ फाइलचा या वेबसाइटच्या मालकाशी कोणताही संबंध नाही. या पोस्टमध्ये दिलेल्या कोणत्याही पीडीएफ बुक, पीडीएफ फाइलबाबत कोणाला काही अडचण असल्यास newsbyabhi247@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधा. आम्ही ते पोस्ट त्वरित साइटवरून काढून टाकू.
मित्रांनो, जर तुम्हाला Vyankatesh Stotra Marathi pdf मध्ये ही पोस्ट आवडली असेल, तर मित्रांना या वेबसाइटबद्दल नक्की सांगा.